Nilesh Rane Tested Positive : माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण

Former MP Nilesh Rane's corona report positive.

एमपीसी न्यूज – माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांना करोनाची लागण झाली आहे. निलेश राणे यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर करोनाची चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं निलेश राणे म्हणाले. 

कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसल्यानं कोरोनाची चाचणी केली. त्यात माझा चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी स्वत:ला सेल्फ क्वारंटाइन करून घेतलं आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करावी आणि काळजी घ्यावी, असं निलेश राणे म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

चार दिवसांपूर्वी त्यांनी सिधुदुर्गात करोनाची चाचणी केली होती. परंतु त्यावेळी चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले होते. परंतु त्यांनी शनिवारी रात्री करोनाची लक्षणं दिसत असल्यानं पुन्हा मुंबईत करोनाची चाचणी केली. त्याचा अहवाल आज मिळाला असून तो पॉझिटिव्ह आला असं त्यांनी सांगितलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.