Former President Pranab Mukherjee Test Positive: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

Former President Pranab Mukherjee corona Test Positive मी रुग्णालयात गेलो होतो. माझी कोरोनाची चाचणी सकारात्मक (पॉझिटिव्ह) आली आहे. माझी विनंती आहे की माझ्या संपर्कात आलेल्यांनी सेल्फ आयसोलेट व्हावे.

एमपीसी न्यूज – देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुखर्जी यांनी आज (दि.10) स्वत: ट्विट् करत याबाबतची माहिती दिली.

माजी राष्ट्रपती मुखर्जी आपल्या ट्विट्मध्ये म्हणतात, मी रुग्णालयात गेलो होतो. माझी कोरोनाची चाचणी सकारात्मक (पॉझिटिव्ह) आली आहे. माझी विनंती आहे की माझ्या संपर्कात आलेल्यांनी सेल्फ आयसोलेट व्हावे. चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह काही केंद्रीय मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरुप्पा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.