New Delhi: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार, 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

84 वर्षांच्या प्रणवदांनी 10 ऑगस्टला कोरोना संसर्गाची माहिती दिली होती. त्याच दिवशी त्यांच्यावर मेंदूतील गुठळ्या काढण्याची शस्त्रक्रिया झाली. फुप्फुसांत संसर्गानंतर ते व्हेंटिलेटरवर होते.

एमपीसी न्यूज- भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. 84 वर्षांच्या प्रणवदांनी 10 ऑगस्टला कोरोना संसर्गाची माहिती दिली होती. त्याच दिवशी त्यांच्यावर मेंदूतील गुठळ्या काढण्याची शस्त्रक्रिया झाली. फुप्फुसांत संसर्गानंतर ते व्हेंटिलेटरवर होते. तेव्हापासून ते कोमात होते. लष्कराच्या ‘रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटल’मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दीर्घकाळापर्यंत काँग्रेसचे नेते राहिलेले मुखर्जी सातवेळा खासदार होते. दरम्यान, प्रणव मुखर्जी यांचे पार्थिव आज (दि.1) सकाळी आठ वाजता रुग्णालयातून त्यांचे अधिकृत निवासस्थान राजाजी मार्ग येथे आणले जाईल. साडेनऊ वाजता वाजता, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतील.

सकाळी 10 वाजता, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान त्यांना श्रद्धांजली वाहतील. सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत त्याचे पार्थिव विशिष्ट लोकांना अंत्यदर्शनासाठी ठेवला जाईल. दुपारी अडीच वाजता लोधी रोड येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोविड प्रोटोकॉल अंतर्गत हे अंत्यसंस्कार केले जातील. प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवस राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.