Pranab Mukherjee Critical : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक

एमपीसी न्यूज – देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर असून ते अजुनही व्हेंटिलेटरवरच आहेत हॉस्पिटलच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्यावर दिल्लीतल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी (दि.10) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 

प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूमध्ये गाठ झालेली आहे आणि त्यांची कोविड चाचणी सुद्धा पॉझिटिव्ह आली असल्यामुळे गुंतागुंत वाढली असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. 84 वर्षांच्या मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांची खास टीम प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या कोविड आणि मेंदूच्या गाठीमुळे डॉक्टरांची काळजी वाढली आहे. राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

दरम्यान, काल स्वत: ट्विट करुन आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याच आवाहन केलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.