Atal Bihari Vajpayee : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे सादरीकरण

एमपीसी न्यूज : निगडी प्राधिकरणात भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यस्मरणा निमित्त त्यांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम पार पडला.(Atal Bihari Vajpayee) अटलजींच्या निवडक नऊ कवितांचे सादरीकरण प्रियंका आचार्य, अनुराधा पेंडूरकर व श्री सुभाष भंडारे यांनी अत्यंत खुमासदारपणे केले.

दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या निवडक कविता वाचनाचा कार्यक्रम कॅप्टन कदम सभागृह , निगडी येथे मंगळवारी पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन , शब्दरंग साहित्य कट्टा, निगडी प्राधिकरण, या संस्थेने केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून  प्रकाश क्षीरसागर हे लाभले होते. याप्रसंगी माजी उपमहापौर शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, माजी नगरसेवक विजय शिंदे उपस्थित होते.

तसेच शब्दरंग साहित्य कट्ट्याचे सभासद व इतर मान्यवर यांनी हजेरी लावली होती. शब्दरंग कट्ट्याच्या सभासद प्रियांका आचार्य यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली.सुभाष भंडारे यांनी शब्दरंग साहित्य कट्ट्याची आतापर्यंतची वाटचाल आणि भविष्यातील योजना याची माहिती श्रोत्यांना थोडक्यात सांगितली.(Atal Bihari Vajpayee) उपस्थित मान्यवर व शब्दरंगचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी भारत माता आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.

Supreme Court : राजकीय पक्षांना आश्वासन देण्यापासून रोखू शकत नाही, मोफत धोरणावर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका

प्रकाश क्षीरसागर, लेखक, विचारवंत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांचे *मला भावलेले वाजपेयी*  या विषयावर अत्यंत विचार प्रवर्तक आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले.(Atal Bihari Vajpayee) आपल्या व्याख्यानात , त्यांनी कै. वाजपेयी यांच्या स्वभाव वैशिष्टयाचे अनेक पैलू उलगडून, उपस्थित सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. चंद्रशेखर जोशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कार्यक्रम आणखी बहारदार केला.अनुराधा पेंढुरकर यांच्या आभार प्रदर्शना नंतर या अविस्मरणीय कार्यक्रमाची सांगता झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.