Lonavala : किल्ले बनवा स्पर्धेत तरुण मराठा, विजय ढाकोळ, हनुमान व शिवजन्मोत्सव मंडळे अनुक्रमे प्रथम

 

एमपीसी न्यूज –  लोणावळा शहरात नुकत्याच पार पडलेल्या किल्ले बनवा स्पर्धेमध्ये मोठ्या गटांमध्ये तरुण मराठा मित्र मंडळ व विजय ढाकोळ ग्रुप यांनी तर लहान गटात हनुमान मित्र मंडळ व शिवजन्मोत्सव मंडळे यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक मिळविला. श्री योद्धा प्रतिष्ठान मित्रमंडळ व बापूसाहेब भेगडे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. लहान व मोठ्या अशा दोन गटात मिळून 65 संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा धगधगता इतिहास व त्यांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले गड किल्ले यांची माहिती आजच्या तरुण पिढीला व्हावी या उद्देशाने नऊ वर्षांपासून श्री योद्धा प्रतिष्ठान मित्रमंडळाच्या वतीने लोणावळा शहरात किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. किल्ला स्पर्धेच्या बक्षीस समारंभानिमित्त शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट व्याख्यान सादर केले.
 संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या हस्ते या किल्ला स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला. यावेळी शिवव्याख्याते यशवंत गोसावी, काॅग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस डाॅ. किरण गायकवाड, राष्ट्रवादी काॅग्रेसचे लोणावळा शहराध्यक्ष जीवन गायकवाड, मनसेचे मावळ तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, ज्येष्ठ नेते दत्तात्रय गवळी, मनसे अध्यक्ष भारत चिकणे, नगरसेवक भरत हारपुडे, निखिल कविश्वर, सेजल परमार, कैलास गायकवाड, योध्दा प्रतिष्ठानचे संस्थापक रुपेश नांदवटे, समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे, पोलीस पाटील सदाशिव सोनार, बाबाजी कुटे, हरिष कोकरे, बाळासाहेब फाटक, विनय विद्वांस, डाॅ. सिमा शिंदे हे मान्यवर उपस्थित होते.
     किल्ले स्पर्धेचा निकाल
 
लहान गट : प्रथम क्रमांक –  हनुमान मित्रमंडळ कुसगाव बु.(देवगिरी) व शिवजन्मोत्सव मंडळ ठोंबरेवाडी (राजगड), द्वितीय क्रमांक –  तरुण मराठा मंडळ गावठाण (राजगड) व शिवबा ग्रुप तुंगार्ली (राजगड), तृतीय क्रमांक – श्रीमंत योगी मित्रमंडळ बारा बंगला (सिंहगड) व  आरसीसी रायवूड ग्रुप रायवूड (प्रतापगड) तर उत्तेजनार्थ म्हणून श्रीराम गवळीवाडा (राजगड) व शिवदुर्ग क्लायंबर ग्रुप नांगरगाव (राजगड) यांना बक्षिसे देण्यात आली.
मोठा गट – प्रथम क्रमांक –  तरुण मराठा मंडळ गावठाण (प्रतापगड) व विजय ढाकोळ ग्रुप खंडाळा (राजगड), द्वितीय क्रमांक – बापुआण्णा भेगडे युवामंच नांगरगाव (कोराईगड) व अमित आर्ट आकुर्डी (रायगड), तृतीय क्रमांक – श्री स्वामी समर्थ नांगरगाव (प्रतापगड) व तुंगार्ली ग्रामस्त (कोराईगड), उत्तेजनार्थ छत्रपती ग्रुप सदापुर (राजमाची) व विद्यार्थ्यांना छावा ग्रुप बोरज (तिकोना) यासह डी.पी.मेहता ज्युनियर काॅलेजच्या विद्यार्थी माऊली मोहिते याने एकट्याने दिड दिवसात साकारलेल्या तोरणा किल्ल्याला विशेष बक्षिस देण्यात आले. तर कुसगाव भैरवनाथनगर संघाला उत्कृष्ट किल्ला बनविल्याबद्दल विशेष पारितोषिक देऊन गैरविण्यात आले.
     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदिप वाडेकर यांनी केले तर प्रास्ताविक रुपेश नांदवटे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.