Pune News : मंडईत महामेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडले अज्ञात प्राण्याचे जीवाष्म

एमपीसी न्यूज : पुण्यात सध्या शिवाजीनगर ते स्वारगेट या महा मेट्रोच्या मार्गावर खोदकाम सुरू आहे. हे खोदकाम सुरू असताना महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांना मंडई परिसरात अज्ञात प्राण्याचे जीवाश्म सापडले आहेत. आकाराने प्रचंड मोठी असलेले हे जीवाश्म दोन हजार वर्षापूर्वीचे असावेत असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बुधवारी काम सुरू असताना जमिनीपासून दहा मीटर अंतरावर ही हाडे सापडली आहे.

महामेट्रोचे कर्मचारी काम करत असताना त्यांना सुरुवातीला एक मोठे हाड सापडले. त्यानंतर खोदकाम केले असता आणखी काही झाडेहाडे सापडण्यास सुरुवात झाली. या हाडांचा आकार मोठा असून ती हत्ती सदृश्य प्राण्याची असावीत असा अंदाज आहे.
दरम्यान ही हाडे अंदाजे दोन हजार वर्षांपूर्वीची असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुरातत्व खात्यातील तज्ञ व्यक्ती आज या ठिकाणी भेट देऊन या हाडांची पाहणी करतील. त्यानंतर याचे गूढ उकलण्यास मदत होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.