Alandi News: सिध्दबेटातील दगडी वॉकिंग ट्रॅकवर दुर्गंधी युक्त अस्वच्छ काळसर पाणी

एमपीसी न्यूज : सिध्दबेटामधील दगडी वॉकिंग ट्रॅकच्या रस्त्यावर काळसर अस्वच्छ पाणी आल्याने या रस्त्यावरून चालणाऱ्या भाविक नागरिकांना येथून चालण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. व या अस्वच्छ पाण्यामुळे येथे मोठी दुर्गंधी पसरली आहे.

येथील सुरक्षा भिंती जवळ मोठ्या प्रमाणात गवत असल्याने हे अस्वच्छ पाणी बाहेरून आत कोठून येत आहे का? ते सद्यस्थितीत येथील वाढलेल्या मोठ्या गवतामुळे दिसून येत नाही.तसेच येथे जवळपास राहणाऱ्या केळगाव हद्दीतील काही बेशिस्त समाजकंटकांकडून सिध्दबेटाच्या सुरक्षा भिंती लगत आतील बाजूस कचरा टाकण्यात येत आहे.

Suresh Kank : एड्स अजूनही संपलेला नाही या जाणिवेने काम व्हावे – सुरेश कंक

त्यामुळे येथील परिसर अस्वच्छ दिसून येत आहे.सिद्धबेट हे संत निवृत्ती, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, संत मुक्ताई यांची लिलाभूमी,कर्मभूमी असल्याने या पवित्र भूमीच्या दर्शनासाठी, भेटीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक येथे येत असतात.या सिध्दबेटा मध्ये पूर्वी अनेक ऋषी मुनींनी तपश्चर्या केली आहे.

अश्या या पवित्र भूमीस अस्वच्छ करण्याचे काम काही समाजकंटक करत आहेत.येथील परिसर अस्वच्छ होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळीच दखल घेऊन येथे योग्य ती उपाय योजना करायला हवी.अशी आळंदीकर नागरिक मत व्यक्त करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.