Pimpri : तडीपारी संपण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असतानाच तो सापडला पोलिसांच्या जाळ्यात

तडीपार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज – तडीपारीच्या कारवाईची मुदत संपण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असताना तडीपार आरोपी गुन्हे शाखा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गुरुवारी (दि. 25) भोसरी येथील बालाजीनगर झोपडपट्टी येथे केली.

पिंटू अनिरुद्ध जाधव (वय 27, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट एकचे पथक वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना एक तडीपार आरोपी बालाजीनगर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून पिंटू याला अटक केली. त्याच्याविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस कायदा कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराईत आरोपी पिंटू याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी 1 नोव्हेंबर 2017 रोजी एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. 1 नोव्हेंबर 2018 रोजी त्याची कारवाईची मुदत संपणार होती. परंतु मुदत संपण्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पिंटू याला अटक करून भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.