Pune : जीवे मारण्याचा प्रयत्न व दहशत निर्माण करुन चार जण फरार

एमपीसी न्युज- अज्ञात कारणावरून घरात घुसून एकाला जीवे  मारण्याचा प्रयत्न करुन कुटुंबातील व्यक्तींना मारहाण तसेच वस्तूंची तोडफोड करून चार आरोपी फरार झाले आहेत. ही घटना रविवारी(दि.19) रात्री 10 वाजता अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी येथे घडली. राकेश कोंढरे (वय अंदाजे 23) असे त्यातील एका आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी यांच्या घरी रात्री 10च्या दरम्यान चार अज्ञात इसम काही कारण नसताना घुसले. फिर्यादीने त्यांना कारण विचारले असता आरोपींनी त्यांच्याजवळ असलेल्या लोखंडी कोयत्याने फिर्यादीला डोक्यात मारून जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर फिर्यादीच्या आई आणि पत्नीला शिवीगाळ करून हाताने मारहाण देखील केली. त्याचबरोबर फिर्यादीच्या मालकीची मोटारसायकल तसेच वस्तीतील रोडवर पार्क केलेल्या रिक्षाच्या काचा फोडून दहशत निर्माण केली.

गुन्ह्यातील आरोपी फरार असून, त्यांनी केलेल्या गुन्ह्याचे कारण अद्याप समजले नाही.तरी याबाबत फरार गुन्हेगारांचा तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.