Chakan News : पाईट येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीशी अत्यंत अश्लिल हावभाव करत व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खेड तालुक्यातील पाईट येथे ही घटना घडली. चाकण पोलिसांनी याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला.

ईश्वर संतोष फुलपगारे, चंदन संतोष फुलपगारे, कल्पना राजेंद्र चव्हाण व शुभम राजेंद्र चव्हाण ( सर्व रा. पाईट, ता. खेड,) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पाईट येथील एका पसतीस वर्षीय महिलेने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी ईश्वर, चंदन, कल्पना व शुभम चव्हाण यांच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल केला. अधिक माहिती अशी की, पाईट येथे वरील सर्वजन व फिर्यादी महिलेचे कुटुंब राहत आहे.

गुरुवारी (दि.१९) सायंकाळी पाचच्या दरम्यान, फिर्यादी व तिची चुलत सासू यांचे जोराचे भांडण सुरु होते. त्यावेळी फिर्यादी महिलेची पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी तिथे आली होती. यावेळी चंदन फुलपगारे याने तिला शिवीगाळ, दमदाटी केली.

तसेच तिच्याशी अत्यंत अश्लिल हावभाव करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून चंदन फुलपगारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.