Pune District Crime News : अल्पवयीन मुलींना पळवून नेणार्‍या चौघांना अटक

एमपीसी न्यूज : जुन्नर तालुक्यातील खोड गावातून 16 नोव्हेंबर रोजी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले होते. ग्रामीण पोलिसांनी या दोन मुलींची सुटका केली असून या मुलींना पळवून नेणाऱ्या चार तरुणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये दोघा भावांचा समावेश आहे. 

शुभम प्रकाश गाडेकर (वय 21), रोहिदास विठोबा गाडेकर (50), प्रकाश विठोबा गाडेकर (56) आणि प्रवीण वाघ (18) अशी आरोपींची नावे आहेत. मोखाडा (जी पालघर) इथून या मुलींची सुटका करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम गाडेकर याचे वडील रोहिदास गाडेकर आणि चुलते प्रकाश गाडेकर यांनी 16 नोव्हेंबर रोजी या दोन्ही मुलींना आळे फाटा येथून मोखाडा येथे जाण्यासाठी बसमध्ये बसवून दिले. तेव्हापासून दोन्ही मुली शुभम गाडेकर आणि प्रवीण वाघ यांच्यासोबत मोखाडा येथे राहत होत्या. मुली गायब झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले असता या मुली मोखाडा येथे असल्याचे समोर आले. त्यानंतर नारायणगाव पोलिसांनी मोखाडा येथे दोन मुलींची सुटका करत दोघा तरुणांना अटक केली. तर त्यांना मदत करणाऱ्या दोन भावाना अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.