Dehuroad Robbery Case : चोरीप्रकरणी चार जणांना अटक

एमपीसी न्यूज – देहूरोड येथे चोरी प्रकरणी (Dehuroad Robbery) चार जणांना अटक करण्यात आली आहे. देहू रोड पोलिसांनी याबाबत कारवाई केली आहे. 

सुनिल म्हस्के (वय 25 वर्षे), विलास धोत्रे (वय 25 वर्षे), संतोष म्हासळकर (वय 26 वर्षे), नागेश पवार (सर्व रा. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर) यांना अटक केली आहे.

Dehu Road Crime News : पालखी सोहळ्यातील भाविक महिलेचे मिनी गंठन चोरले; चारजण ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या खिशातील 53,500 रुपये रोख रक्कम आरोपींनी स्वतःच्या फायद्याकरिता त्यांच्या साथीदारांच्या मदतीने 21 जूनला दुपारी 1.30 वा काढून घेऊन पळून गेले.

याप्रकरणी सर्व आरोपिंच्या विरोधात देहू रोड पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम 392, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.