Pune News : रेल्वे प्रवासी व वाटसरुना लुटण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक 

एमपीसी न्यूज – पुणे स्टेशन ते मालधक्का चौकाच्या दरम्यान रेल्वे प्रवासी वाटसरुना लुटण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना गुन्हे शाखा युनिट दोनकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कोयते, मिरची पावडर एक मोबाईल हँडसेंट असा 5 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, यांच्या सोबत असलेला आणखी एकजण अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेला आहे. 

 

अमोल अंकुश लांबतुरे (वय 19, रा. लातुर), युवराज कल्याण चव्हाण (वय 30, रा. भुम परांडा, जि. उस्मानाबाद) मनोज सुभाष पवार (वय 30, रा. मुळेगाव तांडा जि. सोलापुर), कुंदन रमेश शिंदे वय 27, रा. कात्रज, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन ते मालधक्का चौकाच्या दरम्यान चार ते पाच जण हातात हात्यारे घेऊन रेल्वे प्रवासी व वाटसरुना लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन टिम तयार करुन मालधक्का चौकाकडुन पुणे स्टेशनकडे येणार्या रोडच्या कडेला अंधारात काहीजण संशयीतरित्या थांबल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले यावेळी एकजण अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेला. चौकशी केली असता रेल्वे प्रवासी व वाटसरुना लुटण्याच्या तयारीत ते असल्याचे त्यांनी सांगितले.

 

हि कामगिरी युनिट-दोनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, पोलीस उपनिरीक्षक पिंगळे, सहाय्यक फौजदार यशवंत आंब्रे, पोलीस हवालदार असलम खान पठाण, पोलीस नाईक मोहसीन शेख, पोलीस नाईक उत्तम तारु, पोलीस नाईक विशाल भिलारे, पोलीस शिपाई मितेश चोरमोले, पोलीस शिपाई गोपाळ मदने यांनी केली आहे. या कामगिरीसाठी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त बच्चन सिंह, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.