Nigdi News : कोयता हातात फिरवून दहशत पसरवणाऱ्या चौघांना अटक

एमपीसी न्यूज – कोयता हातात फिरवून महिलेला मारहाण करत परिसरात दहशत पसरवणाऱ्या चौघांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.7) ओटास्कीम निगडी येते घडला.

सॅमसन रॉबर्ट जॉन (वय 25), सुरज वाघमारे (वय 22), रफिक शेख (वय 20), सलमोन रॉबर्ट जॉन (वय 30) यांना अटक केली असून अणखी एका 19 वर्षीय तरूणीवर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 28 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Traffic Diversion News: सायकल रॅली साठी बाणेर, बालेवाडी व वाकड मध्ये उद्या वाहतुकीत बदल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात झालेल्या पूर्वीच्या भांडणातून आरोपी मोठमोठा आरडो ओरडा करत आले. त्यांनी हातातील कोयत्याने तेथे थांबलेल्या गाडीवर फिर्यादीच्या घराच्या दरवाज्यावर मारले. फिर्यादी यांनी दरवाजा उघडला असता आरोपींनी फिर्यादीवर वार कऱण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादींनी पुन्हा दरवाजा बंद केला. त्यानंतर फिर्यादी पोलीस ठाण्यात तक्रार कऱण्यासाठी जात असताना आरोपींनी महिला आरोपी व आणखी एका महिलेने फिर्यादीला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली व माझ्या मुलाची तक्रार दिली तर तुला बघून घेईन अशी धमकी दिली. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.