Wakad Crime News : घरावर दगडफेक करत कारची तोडफोड; चौघांना अटक

एमपीसी न्यूज – एका खून प्रकरणातील मयत तरुणाच्या मित्रांनी खून प्रकरणातील आरोपीच्या घरावर दगडफेक करून कारची तोडफोड केली. ही घटना शनिवारी (दि. 25) पहाटे पाटील चाळ, थेरगाव येथे घडली.

करन जैस्वाल (वय 25, रा. गणेश नगर,थेरगाव), करन सोनवणे (वय 20, रा. 16 नंबर बस स्टॉप, थेरगाव), वैभव गायकवाड (वय 23, रा. जांबे, पुणे), समाधान परिहार (वय 21, रा. जांबे, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नारायण साहेबराव गायकवाड (वय 59, रा. पाटीलचाळ, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा एका खुनाच्या गुन्ह्यात आरोपी आहे. त्या प्रकरणातील मयत तरुणाच्या मित्रांनी आपसात संगनमत करून कोयते घेऊन फिर्यादी यांच्या घरावर घाव घातले. कोयते हवेत फिरवून जोरजोरात ओरडून शिवीगाळ केली तसेच परिसरात दहशत निर्माण केली. फिर्यादी यांच्या कारची तोडफोड करून नुकसान केले. दरम्यान, पोलिसांनी चौघांना अटक केली असून याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.