Pune : दुचाकी अडवून जबरदस्तीने चोरी करणा-या चौघांना अटक

एमपीसी न्यूज – दुचाकी अडवून जबरदस्तीने चोरी केल्याची घटना काल सोमवारी (दि.8) मध्यरात्री साडेबारा च्या दरम्यान शिवाजीनगर येथील संचेती हॉस्पिटल येथील चौकात घडली. याप्रकरणी नचिकेत गोली (वय 19, रा. शिवाजीनगर) याने फिर्याद दिली होती.

किशोर मधु आंबवणे (वय 24, रा. पाटील इस्टेट शिवाजीनगर), निलेश नितीन पवळे (रा. पाटील इस्टेट शिवाजीनगर), शहाणेअली सय्यदनूर जॉदशहा इराणी (वय 18 महात्मा गांधी वसाहत, शिवाजीनगर), व यश दत्त हेळेकर(वय 18, रा. कामगार पुतळा अशी करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नचिकेत हा त्याच्या मित्रांसोबत दुचाकीवर रात्री उशीरा आपल्या घरी जात असताना काही इसमांनी त्यांना अडवले व नचिकेतसह त्याच्या मित्रांना मारहाण करून नचिकेतची मोपेड व त्याचा मित्र सुरेंदरच्या गळ्यातील सोन्याची चैन असा एकूण 55 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. त्यानंतर पोलीस स्टेशनला याप्रकरणी तक्रार
नोंदवल्यानंतर आरोंपीचे वर्णन सांगितल्याप्रमाणे पोलीसांनी त्यातील एका संशयिता आरोपीला ताब्यात घेतले व त्याच्याजवळ सखोल चौकशी करून त्याच्या साथीदारांची माहिती मिळवून त्यांनादेखील ताब्यात घेतले.

याप्रकरणी पोलीसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.