Chakan : शिवीगाळ केल्याचा जाब विचारणा-यास चौघांकडून मारहाण

एमपीसी न्यूज – शिवीगाळ करून गर्दी काढ म्हणणा-याला जाब विचारल्यावरून चार जणांनी मिळून एकाला मारहाण केली असल्याची फिर्याद चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 29) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

सचिन सुदाम परदेशी (वय 36, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मंदार देशमुख, केदार देशमुख, ओंकार करपे, चिकू थोरात (सर्व रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथे रविवारी दुपारी जवळेकर ज्वेलर्स या दुकानाचा उद्घाटन समारंभ होता. या कार्यक्रमासाठी दुकानाच्या आजूबाजूला गर्दी झाली. त्यामुळे आरोपी मंदार त्या ठिकाणी आला आणि त्याने शिवीगाळ करत ‘गर्दी काढ’ असे सांगितले. सचिन यांनी मंदारला शिवीगाळ केल्याचा जाब विचारला. यावरून आरोपींनी सचिन यांना धक्काबुक्की केली.

याबाबत सचिन चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद देणार असल्याचे समजल्यावर ‘तू आमच्या विरोधात पोलीस तक्रार देणार का. तुला माज आला आहे का’ असे म्हणत सचिन यांना काठाण्यांनी मारहाण केली. यामध्ये सचिन यांच्या डोक्याला व हाताला गंभीर इजा झाली, असे सचिन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like