Nigdi Crime News : लघुशंका करण्यावरून भांडणे करणा-यांवर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सार्वजनिक उघड्या ठिकाणावर लघुशंका करण्याच्या कारणावरून भांडणे करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार प्राधिकरण पोलीस चौकीच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर, निगडी येथे मंगळवारी (दि. 5) रात्री नऊच्या सुमारास घडला.

राम विजय जाधव (वय 22), स्वप्निल गौतम कांबळे (वय 30), सोहनलाल ओम प्रकाश पिंपला (वय 32), शाहिद रशीद शेख (वय 21, सर्व रा. आकुर्डी), यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक राहुल मिसाळ यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 6) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम जाधव, स्वप्निल कांबळे, सोहनलाल पिंपला आणि शाहिद शेख या चौघांनी सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरडा केला त्यामुळे लोकांची गर्दी झाली, तसेच त्या चौघांनी एकमेकांवर धावून जात शिवीगाळ सुद्धा केली. सार्वजनिक उघड्या ठिकाणावर लघुशंका करण्याच्या कारणावरून आपापसात भांडणे केली.

दरम्यान, चौघांनीही सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. सहाय्यक पोलीस फौजदार खंडाळे याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.