Dighi Crime News : ऑफिस सुरू करण्यासाठी एक लाख रुपये न दिल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – लग्नात हवी ती भांडी दिली नाही तसेच नवऱ्याच्या ऑफिससाठी एक लाख रुपये न दिल्याने सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. ही घटना सन 2018 पासून 20 जानेवारी 2022 या कालावधीत नवीन पनवेल येथे घडली.

पिडीत विवाहितेने माहेरी आल्यानंतर या प्रकरणी गुरुवारी (दि. 20) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती किरण लक्ष्मण साळूंके, सासू, सासरे लक्ष्मण ज्ञानू साळूंके, दीर किशोर लक्ष्मण साळूंके (सर्व रा. पनवेल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहानंतर आरोपींनी फिर्यादी यांना वेळोवेळी त्रास दिला. नवऱ्याला ऑफिस टाकण्यासाठी एक लाख रुपये का दिले नाही, या कारणाने फिर्यादी यांचा छळ केला. ‘तुला घरातील कामे येत नाही, आम्ही लग्नात मागितलेली भांडी दिली नाही, आमच्या मनाप्रमाणे लग्न करून दिले नाही, असे म्हणत आरोपींनी फिर्यादी यांना उपाशी ठेवले. बेडरूममध्य कोंडून ठेवत त्यांचा शारिरीक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरिक्षक भीमसेन शिखरे तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.