Dighi Crime News : भाडे करार मागितल्याने भाडेकरू तरुणांकडून सोसायटी पदाधिकाऱ्यास मारहाण

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या पदाधिका-याने सोसायटीत भाड्याने राहणा-या तरुणांकडे भाडेकरार मागितला. यावरून चार जणांनी मिळून सोसायटीच्या पदाधिका-याला हाताने व लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना तनिश साईकुंज, वडमुखवाडी येथे घडली.

पृथ्वीराज पाटील, ओंकार ठोंबरे (दोघे रा. तनिश साईकुंज, वडमुखवाडी) आणि त्यांचे दोन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विलास संग्राम चामे (वय 40, रा. तनिश साईकुंज, वडमुखवाडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पृथ्वीराज आणि ओंकार हे वडमुखवाडी येथील तनिश साईकुंज या सोसायटीमध्ये भाड्याने राहतात. फिर्यादी हे त्या सोसायटीचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपी पृथ्वीराज याच्याकडे भाडेकरार मागितला. या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच ओंकार याने फिर्यादी यांना लोखंडी रॉडने तोंडावर मारून जखमी केले. याप्रकरणी दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.