Cyber Crime: कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरविल्याप्रकरणी दोन दिवसांत चार गुन्हे दाखल; चौघांना अटक

Four cases filed in two days for spreading rumors about Corona on social media; Four arrested या गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात जातीय टिप्पणीचा मजकूर असणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.

एमपीसी न्यूज- लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागाकडून राज्यातील सोशल मीडियावर लक्ष ठेवले जात आहे. मागील दोन दिवसांत चार गुन्हे दाखल करत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात आजपर्यंत (2 जुलै) राज्यामध्ये 514 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात 273 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे. बुधवारी (दि.1) अकोला जिल्ह्यातील बशीरतकाली पोलीस ठाण्यामध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात जातीय टिप्पणीचा मजकूर असणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ही पोस्ट आक्षेपार्ह असल्यामुळे सायबर विभागाकडून कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल –

# व्हॉट्स अ‍ॅप- 197 गुन्हे

# फेसबुक पोस्ट्स – 214 गुन्हे

# टिकटॉक व्हिडिओ- 28 गुन्हे

# ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – 11 गुन्हे

# इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- 4 गुन्हे

# अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – 60 गुन्हे

# 108 आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

ऑनलाईन औषधे मागवताना काळजी घ्या; सायबरचे आवाहन

सध्याच्या काळात बरेच लोक विशेषतः ज्येष्ठ नागरिक ऑनलाईन विविध अ‍ॅपद्वारे औषध मागवत आहेत. अशा अ‍ॅपद्वारे औषध मागविण्याआधी, ते अ‍ॅप वापरण्यासाठी सुरक्षित आहे का, याची खात्री करा व मगच वापरा.

कुठल्याही अ‍ॅपवर शक्यतो आपला बँक खात्याचा नंबर, डेबिट / क्रेडिट कार्ड नंबर व त्यांचे पिन नंबर स्टोर करू नका. तसेच त्या अ‍ॅपवरून मागविलेली औषधे डिलिव्हरी द्यायला घरी येतील, तेव्हा तुम्ही मागविलेली औषधे आणि डिलिव्हरीसाठी आलेली औषधे एकच आहेत का, याची खात्री करून घ्या.

शक्यतो cash on delivery चा पर्याय ऑर्डर बुक करताना निवडा. जर अशा वेबसाईट किंवा अ‍ॅपवर तुम्ही फसविले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करा. www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर देखील आपली तक्रार नोंदवा, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like