Wakad : गृह अतिक्रमण करून धमकी दिल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे घरात येऊन घर मालकाला शिवीगाळ करत धमकी दिल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 29) रात्री साडेसातच्या सुमारास ओमेगा पॅराडाईस फेज 2, वाकड येथे घडला.

राजेश पिल्ले पूर्ण नाव पत्ता माहिती नाही व त्याचे तीन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोनम पुष्पेंद्र पांडे (वय 31, रा. रत्नदीप कॉलनी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती यांनी ओमेगा पॅराडाईस फेज 2 वाकड येथे नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. त्या फ्लॅटची गृहप्रवेशाची तयारी तसेच फ्लॅटमध्ये टीव्ही फिटिंग करीत असताना आरोपी बेकायदेशीरपणे फ्लॅटमध्ये आले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांचे पती पुष्पेन्द्र यांना हा फ्लॅट माझा आहे, तू येथून गेला नाहीतर तुला बघतो अशी धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.