Hinjawadi : दुचाकीस्वाराला मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असलेल्या तरुणाला कारमधून आलेल्या चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. तसेच तरुणाला जीवे मारण्याची धमकी देऊन दुचाकीचे नुकसान केले. ही घटना मंगळवारी (दि. 10) सायंकाळी सहाच्या सुमारास मारुंजी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

संकेत राजू कुंभार (वय 21, रा. मारुंजी गावठाण, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आकाश चव्हाण (रा. मारुंजी) आणि त्याचे तीन साथीदार (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास संकेत मारुंजी येथील एचपी पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात होते. त्यावेळी कारमधून आलेल्या आरोपींनी संकेत यांच्या दुचाकीला धडक दिली. चार जणांनी मिळून संकेत यांना बेदम मारहाण केली. यामध्ये सांकेत यांच्या डोक्यात, पाठीवर, छातीवर दुखापत झाली. आरोपींनी संकेत यांना जीवे मारण्याची धमकी देत दुचाकीचेही नुकसान केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.