Pimpri : महिलेच्या फसवणूकप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेच्या नावावर कर्ज घेऊन दोन मोबाईल फोन घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरीगाव आणि रिलायन्स मॉल आकुर्डी येथे घडली.

अजिंक्य माळवदकर (वय 32, रा. हडपसर), उमेश पुजारी (वय 27, रा. हडपसर), नितीन गायकवाड (वय 45, रा. पुणे), अभिषेक माळवदकर (वय 27, रा. नायगाव, ता. सासवड), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अनिता किशोर वाघमारे (वय 34, रा. पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी अनिता यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या नावावर आयडीबीआय बँकेचे 36 हजार 850 रुपयांचे कर्ज काढले. त्यातून एक आयफोन खरेदी केला. त्यानंतर कॅपिटल आयडीएफसीमधून 19 हजार 522 रुपयांचे कर्ज काढले. त्यातून एक मोबाईल फोन खरेदी केला. अनिता यांच्या नावावर एकूण 56 हजार 372 रुपयांचे कर्ज काढून दोन मोबाईल आरोपींनी खरेदी केले. हे मोबाईल फोन अनिता यांना देण्यासाठी टाळाटाळ करून त्यांची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.