Hinjawadi : कंपाउंड पाडून कामगारांना मारहाण करत खोट्या तक्रारी दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – आपल्या जागेत कंपाउंडचे बांधकाम करणा-या कामगारांना मारहाण करून कंपाउंडचे बांधकाम पाडले. तसेच जागेच्या मालकाला शिवीगाळ करून मारण्याची तसेच खोट्या तक्रारी पोलिसांकडे दाखल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 सप्टेंबर रोजी दुपारी हिंजवडी येथे घडली.

किशोर शेषराव पोरवाल (वय 56, रा. शिवाजीनगर) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, बाबा शेख, अफजल नुरमोहम्मद खान, इरफान शेख, संतोष पूर्ण (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशोर यांची हिंजवडी परिसरात स्वतःची जागा आहे. त्या जागेत ते कंपाउंडचे काम करत होते. त्यावेळी आरोपींनी किशोर यांच्या जागेत बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले. किशोर यांना त्याच्याच जागेत येण्यास मज्जाव केला. कंपाउंडचे तीन खांब आणि कंपाउंड पाडले. बांधकाम करणा-या कामगारांना मारहाण करून किशोर आणि त्यांच्या भावाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच ‘आम्ही तुमच्या विरोधात आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या खोट्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.