Lonavala : विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकाची चार तासाने सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज – विसापूर किल्ल्यावर ट्रेकसाठी गेल्यानंतर अपुर्‍या माहितीमुळे रस्ता भरकट जंगलात अवघड ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांची चार तासांच्या पराकाष्ठेनंतर सुखरुप सुटका करण्यात आली.

तळेगाव जनरल हाॅस्पिटल येथील शिकाऊ डाॅक्टरांपैकी आठ ते दहा जण सोमवारी विसापूर किल्ला परिसरात ट्रेकला आले होते. सोमवारी (दि.15) रोजी सकाळी ते विसापूर किल्ल्यावर चढाई करत असताना अमर कोरे हा रस्ता भरकटल्याने जंगलात अवघड ठिकाणी आडकला. त्या ठिकाणाहून त्याला खाली उतरणे अथवा वर चढाई करणे शक्य नव्हते. यावेळी कौशिक पाटील या त्यांच्या मित्राने लोणावळ्यातील शिवदुर्गच्या टीमला लोकेशन पाठवत मदतीकरिता पाचारण केले. यावेळी शिवदुर्गचा कार्यकर्ता सागर कुंभार हा भाजे लेणी परिसरातच होता. त्याने तत्परता दाखवत घटनास्थळाकडे दाखल होत अमरला धीर देत टीम व साहित्य मागावून घेतले. अर्धा ते पाऊण तासात लोहगड मार्गे टीम गाय खिंडीत दाखल झाली.

किल्ल्यापर्यंत गाडी जाणे शक्य नसल्याने पायी प्रवास करत टीम किल्ल्याजवळ पोहोचली. दुपारी दोनच्या सुमारास रेक्यू कार्य सुरु करत सायंकाळी साडेचार वाजता विकास मावकर या शिवदुर्गच्या शिलेदाराने सागरच्या मदतीने अमरला सुखरुप बाहेर काढण्यात आले. साडेचार तास अमर हा एका दगडाला धरुन थांबला होता. रेस्क्यू सुरु असताना पावसाने रुद्र रुप धारण केले होते. त्यावर मात्र करत शिवदुर्गने रेस्क्यू मोहीम यशस्वीपणे पार पाडली.

विकास मावकर, सागर कुंभार, सागर बाळकुंद्री, पवन म्हाळसकर, दत्ता तनपुरे, रोहित नगिने, हेमंत वाघमारे, निलेश निकाळजे, अनिल आंद्रे, वैष्णवी भांगरे, निकेत तेलंगे,अमित भदोरीया, दिनेश पवार, आनंद गावडे, सुनील गायकवाड या टीमने सदरचे रेक्यू ऑपरेशन पूर्ण केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.