Pune News : पुण्यात हरणासह पाच सशांची शिकार, चार शिकारी अटकेत

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात वन्य प्राण्यांची शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका चिंकारा जातीच्या हरणासह पाच सशांची शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी वन्यजीवसंरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील चार जणांना अटक करण्यात आली. 

सुनिल मारुती शिंदे, संग्राम सुनील माने, दादा रामभाऊ पवार आणि वैभव सुभाष घाडगे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील पाचवा आरोपी मात्र फरार झाला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, बारामती तालुक्यातील पणदरे वनपरिक्षेत्रात वनविभागाचे काही कर्मचारी गस्त घालत होते. यावेळी त्यांना वन विभागात बेटर यांच्या हालचाली जाणवल्या. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची माहिती देत छापेमारी केली. त्यादरम्यान पाच आरोपी हरील आणि सशांची शिकार करताना रंगेहात सापडले. दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांची चाहूल लागताच एक आरोपी पळून गेला तर चौघांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.