Pune crime : चार किलो गांजासह एकाला बावधन येथून अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने बावधन येथून अटक केली आहे. त्याच्याकडून चार किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला आहे.(Pune crime) ही कारवाई शनिवारी (दि. 26) रात्री उत्तमनगर रोड, बावधन येथे करण्यात आली.

हारून बाबू खान (वय 34, रा. उत्तमनगर रोड, बावधन) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह आशिष पांडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार संतोष दिघे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune News : पुण्याचा अक्षत ज्यूनियर राष्ट्रीय विजेता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हारून खान याने त्याच्या घरात विक्रीसाठी गांजा आणला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.(Pune crime) त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री पावणे आठ वाजता खान याच्या घरावर छापा मारला. त्यात 1 लाख 5 हजार 750 रुपये किमतीचा चार किलो 230 ग्रॅम गांजा जप्त जप्त करण्यात आला. पोलिसांनी गांजासह 20 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोनही जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.