Char Dham Yatra Accident : चारधाम यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात, बारामतीतील चौघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – चारधाम यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला नोएडामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात बारामतीमधील चार भाविकांचा मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे हा अपघात झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर बारामती वर शोककळा पसरली आहे.

चंद्रकांत नारायण बोराडे, सुवर्णा चंद्रकांत बोराडे, रंजना भरत पवार आणि मालन विश्वनाथ कुंभार अशी मृत्युमुखी पडलेल्या चौघांची नावे आहेत. त्यातील रंजना पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे खासगी स्वीय सहाय्यक सचिन पवार यांचा मातोश्री आहेत. याच अपघातात स्वयंपाक करणाऱ्या निवंतण मुजावर या महिलेचा देखील मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील पन्नास भाविक बस आणि बोलेरो गाडीतून चारधाम यात्रेला निघाले होते. बोलेरो गाडीतून सात प्रवासी प्रवास करत होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ते दिल्लीच्या दिशेने निघाले असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. समोर जाणार्‍या डंपरला बोलेरो गाडीने जोराची धडक दिली, यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ट्विटरद्वारे अपघातग्रस्तांना मदत करण्याची विनंती केली. मृत्यूमुखी पडलेल्या बारामतीतील नागरिकांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बारामती येथे आणायचे असल्याने मदत करावी अशी विनंती त्यांनी ट्विटरद्वारे केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.