_MPC_DIR_MPU_III

Accident News : देहूरोड, पिंपरी, चाकण येथील वेगवेगळ्या चार अपघातात चौघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – देहूरोड आणि पिंपरी येथे प्रत्येकी एक, तर चाकण येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये (Accident) चार जणांचा मृत्यू (Death) झाला. रस्त्यावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतुकीचे नियम ( Traffick Rule)  न पाळल्याने यातील अनेक घटना घडत आहेत. चारही अपघातांबाबत रविवारी (दि. 24) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

_MPC_DIR_MPU_IV

देहूरोड रेल्वे ब्रिजजवळ ( Dehuroad Railway Bridge) शनिवारी (दि. 23) रात्री कंटेनरने कारला धडक दिली. त्यात कार चालकाचा मृत्यू झाला. प्रतीक शिरीष हिरवे (वय 29, रा. साई कॉर्नर, रास्ता पेठ, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव आहे. याबाबत कंटेनर चालक मांगीलाल मोहनलाल उर्फ मोहनराम खिचड (वय 33, रा. राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

मोरवाडी, पिंपरी येथील सेंट्रल मॉल ( Central Mall) जवळ एका दुचाकीने दुस-या दुचाकीला धडक दिली. त्यात धडक देणा-या दुचाकीवरील सह प्रवाशाचा मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार जखमी झाला. अर्जुन किसन बिस्ट (वय 35, रा. देहूरोड) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत एमएच 12 / बीक्यू 9422 या क्रमांकाच्या दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

चाकण जवळ मेदनकरवाडी आणि नाणेकरवाडी येथे दोन अपघात झाले. मेदनकरवाडी येथील अपघातात विशाल पांडू चैरे (वय 25) याचा मृत्यू झाला आहे. याबाबत छोटीराम बोवाजी कोकणी (वय 29, रा. चाकण) यांनी फिर्याद दिली आहे.

मयत विशाल चैरे रस्त्याने पायी चालत जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. त्यात विशाल यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती न देता अज्ञात वाहन चालक तिथून वाहनासह पळून गेला आहे.

नाणेकरवाडी येथील अपघातात ग्यान बहादूर जोगराज मडई असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मोहन धरमसिंग भोहरा (वय 25, रा. नाणेकरवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश नामदेव पवार (रा. सुपा, ता. पारनेर, जि. अहमदनर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरून रस्ता ओलांडत असताना एका टेम्पोने (एम एच 16 / सी सी 9763) ग्यान बहादूर यांना जोरात धडक दिली. त्यात त्यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.