Sangvi : कार पार्क करण्यावरून चौघांना मारहाण; महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – कार पार्क करण्याच्या कारणावरून पती, पत्नी, मुलगा आणि मुलगी असे चौघांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 1) रात्री दहा वाजता पिंपळे निलख येथे घडली. तसेच आरोपींनी महिलेचे चारित्र्य खराब करण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला.

प्रणय गहरवार (वय 42), सुजाता गहरवार (वय 37), इंद्रजित गहरवार (वय 65), विठ्ठल अढळ, चेतन अढळ, विठ्ठल अढळ याची पत्नी (सर्व रा. पिंपळे निलख) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 46 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी, त्यांचे पती, मुलगा आणि मुलगी यांना गाडी पार्क करण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी प्रणय याने फिर्यादी यांच्या मुलाची नोकरी घालवण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी महिलेचे चारित्र्य खराब करण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.