Pune : ओएलएक्सवर कार विकण्याच्या बहाण्याने महिलेची चार लाखांना फसवणूक

एमपीसी न्यूज – ओएलएक्सवरून कार विकण्याच्या बहाण्याने एका महिलेची अज्ञात मोबाईल धारकाकडून चार लाखांना फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका 32 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याप्रमाणे एक अज्ञात मोबाईलधारक व पेटीएम धारक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना ओएलएक्सवर विक्री करण्याच्या बहाण्याने अज्ञात मोबाईल धारकाने फोनवरून संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर 15 मे ते 3 जुलै या कालावधीत फिर्यादी यांना वेळोवेळी एकूण 3 लाख 96 हजार रुपये भरण्यास भाग पाडून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली.

शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.