Chikhali : चौघांकडून पाच मोटारसायकलसह 12 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज – चिखली पोलिसांनी तिघांना अटक करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौघांकडून पाच मोटारसायकल, 12 मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील पाच आणि चाकण पोलीस ठाण्यातील एक असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

संदेश प्रभाकर पाटोळे (वय 25), रुपेश जनार्धन सावदेकर (वय 19), तेजस राजेश वानखेडे (वय 18, तिघे रा. रुपीनगर, तळवडे), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक विपुल होले आणि पोलीस शिपाई संतोष सपकाळ यांना माहिती मिळाली की, तळवडे रोड चिखली येथील मंगलमूर्ती हॉटेलसमोर काहीजण थांबले आहेत. त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरीची आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकलबाबत चौकशी केली असता त्यांनी ती दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले. त्यानुसार तिघांना अटक करण्यात आली. चौघांकडून पाच मोटारसायकल आणि 12 मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश जवादवाड, उपनिरीक्षक देशमुख, पोलीस कर्मचारी मंगेश गायकवाड, बाबासाहेब गर्जे, सुनील शिंदे, चेतन सावंत, विपुल होले, नरहरी नाणेकर, कबीर पिंजारी, संतोष सपकाळ, अस्वले यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.