Pune News : रांजणगाव एमआयडीसीतील चार मोबाईल चोर ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात 

एमपीसी न्यूज : रांजणगाव एमआयडीसीत मोबाईल चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आदर्श गहिनीनाथ  हुलगे (वय 20 वर्षे रा टाकळी, ता. माढा, जि सोलापूर), उत्कर्ष भीमराव बनसोडे (वय 19 वर्षे रा. न्यू बालाजी नगर, उमरगा, जि उस्मानाबाद),  महादेव शंकर जमादार (वय 22 वर्षे रा. हनुमान नगर  उमरगा जि उस्मानाबाद) आणि श्रीनिवास  जनार्दन मानेपाटील  (रा. औटी प्लॉट, उमरगा ता. उमरगा जि उस्मानाबाद) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये तीन मोबाईल चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना यातील एक मोबाईल सोलापूर येथे असल्याचे समजले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोलापूर येथे जाऊन आरोपी आदर्श हुलगे याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने इतर साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे कबूल केले.

त्यानंतर पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने उस्मानाबाद जिल्ह्यात जाऊन इतर आरोपीना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.