Dehuroad : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – दुसरा विवाह केल्याची माहिती लपवून ठेवून विवाहितेला मारहाण करून तिचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरा आणि दोन नणंदेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना देहूरोड येथे घडली.

पती संजय शिवदास पराडे, सासरा शिवदास दिगंबर पराडे, सुनिता बाळासाहेब घोगरे आणि अनिता संजय येवले अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 32 वर्षीय विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 10 जानेवारी 2018 ते 27 जून 2019 या कालावधीत घडला आहे.

फिर्यादी महिलेचा पती संजयने दुसरा विवाह केला. याची माहिती त्याने पहिल्या पत्नीपासून लपविली. तसेच तो पत्नी आणि मुलाला मारहाण ही करत असे. तसेच सासरच्या इतर मंडळींनीही विवाहितेचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. फौजदार चव्हाण तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.