Chakan : दोन पादचाऱ्यांना चौघांनी लुटले

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या दोघांना चार अनोळखी इसमांनी लुटले. ही घटना बुधवारी (दि. 28) रात्री अकराच्या सुमारास नाणेकरवाडी चाकण येथे घडली.

पप्पू राजेंद्र पांडे (वय 38, रा. मुटकेवडी चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी पप्पू आणि त्यांचे मित्र तानाजी सोलंकर हे दोघे पायी चालत जात होते. ते दोघे नाणेकरवाडी येथील मिंडा कंपनीच्या समोर आले असता चार अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. त्यांच्याकडील दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण नऊ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.