Wakad News : विवाहितेवर लैंगिक अत्याचार आणि छळ प्रकरणी पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल

पतीला अटक

एमपीसी न्यूज – पीडित विवाहितेवर पतीने जबरदस्तीने वारंवार अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार केला. पतीच्या  सासू आणि दोन मामे सास-यांनी चिथावणी दिली तसेच विवाहितेवर दबाव आणून तिचा छळ केला. नवीन गिरणी सुरु करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. याबाबत पती, सासू आणि दोन मामे सासरे अशा चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी 27 वर्षीय पतीला अटक केली आहे. पीडित विवाहितेने याबाबत गुरुवारी (दि. 17) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 24 एप्रिल 2019 ते 25 जून 2020 या कालावधीत वैदूवाडी हडपसर आणि कावेरीनगर वाकड येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने पीडित विवाहितेला गुलामासारखे वागवले. दारूच्या नशेत विवाहितेला अश्लील व्हिडीओ दाखवून विवाहितेच्या इच्छे विरोधात तिच्यावर अनैसर्गिकरित्या वारंवार लैंगीक अत्याचार केला. पतीच्या कृत्यासाठी सासू आणि दोन मामे सास-यांनी समर्थन दिले. नात्याचा दबाव आणून अनैसर्गिक संबंधांबाबत जाहीर वक्तव्य करून विवाहितेचा विनयभंग केला.

आरोपी पती आणि सासूने विवाहितेकडे नवीन गिरणी टाकण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. विवाहितेचे सर्व दागिने काढून घेऊन तिला घरातून हाकलून देत तिचा मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीतआहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.