BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : इंद्रायणी नदीतून बेकायदेशीर वाळू उपसा करणार्‍या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीतून बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा गीते (वय 36, रा. चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि 21) रात्री अकराच्या सुमारास देहूगाव येथील इंद्रायणी नदीच्या पात्रात देहूगाव – खालुम्ब्रे बंधाऱ्याजवळ काहीजण वाळू उपसा करताना आढळून आले. एक जेसीबी 3 ट्रॅक्टर आणि वाळू उपसा करण्यासाठी लागणारे साहित्य वापरून चार जण वाळू उपसा करीत होते. याबाबत अतुल यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. आरोपींवर महाराष्ट्र महसूल अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like