-MPC-TOP-MOST-BANNER-I

India Corona Update : देशात गेल्या 24 तासांत चार हजार मृत्यू, 42,015 नवे कोरोना रुग्ण 

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 3 हजार 998 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, 42 हजार 015 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 12 लाख 16 हजार 337 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना रुग्णांपैकी 3 कोटी 03 लाख 90 हजार 687 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 36 हजार 977 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 97.35 टक्के एवढा झाला आहे.

देशात सध्या 4 लाख 07 हजार 170 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 18 हजार 480 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 3 हजार 998 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

देशात आजवर 44 कोटी 91 लाख 93 हजार 273 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 18 लाख 52 हजार 140 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 41 कोटी 54 लाख 72 हजार 455 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे देशाचा पॉझिटिव्हीटी रेट मागील तीस दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट सध्या 2.27 टक्के एवढा आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.