Chakan News : काळूस येथील दोन शेतकऱ्यांची चार हजार फूट केबल चोरीला

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील काळूस येथील दोन शेतकऱ्यांची चार हजार फूट केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 23) सकाळी भाम नदीच्या किनारी उघडकीस आली.

गणेश सोपान पवळे (वय 32, रा. पवळेवस्ती, काळूस ता. खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या शेजारी असलेल्या एका शेतकऱ्याने इलेक्ट्रिक मोटारसाठी भाम नदीच्या किनारी केबल वायर टाकली होती. मंगळवारी रात्री 11 ते बुधवारी सकाळी सात वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी 60 हजार रुपये किमतीची चार हजार फूट केबल वायर चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.