Chinchwad News : भोसरी, मोशी, वाकड, देहूरोड परिसरातून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – भोसरी, मोशी, वाकड, देहूरोड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चार दुचाकी वाहने चोरून नेली. याबाबत मंगळवारी (दि. 1) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

अकबर अझमोद्दीन इनामदार (वय 63, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इनामदार यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / एफ ए 9721) दिघीरोड़ येथून चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

संदीप निवृत्ती शिंदे (वय 38, रा. मोशी) यांची 30 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली. याबाबत शिंदे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

निलेश विश्वनाथ सोनगिरे (वय 34, रा. पाटील नगर, चिखली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनगिरे यांची 80 हजारांची दुचाकी (एम एच 14 / सी वाय 3010) अज्ञात चोरट्यांनी काळेवाडी येथून चोरून नेली आहे.

गणेश जयकुमार पिल्ले (वय 28, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिल्ले यांची 10 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पारशीचाळ येथून चोरून नेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1