Chinchwad : पिंपरी, आळंदी, दिघीतून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी मधून दोन तर आळंदी आणि दिघी परिसरातून प्रत्येकी एक अशा एकूण चार दुचाकी चोरीला गेल्याबाबत रविवारी (दि. 29) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर चिखली परिसरात एका टेम्पोमधून बॅटरी चोरीला गेली आहे.

पिंपरी पोलीस ठाण्यात गौरव समाधान खैरनार (वय 20, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली. खैरनार यांची 50 हजारांची दुचाकी (एम एच 14 / जी क्यू 6030) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पार्किंग मधून चोरून नेली.

विशाल बाजीराव बनसोडे (वय 33, रा. केशवनगर, कासारवाडी) यांनीही पिंपरी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीबाबत फिर्याद दिली आहे. बनसोडे यांची 10 हजारांची दुचाकी (एम एच 14 / बी यु 0320) पिंपरी येथील टाटा मोटर्स कंपनीच्या मेन गेटसमोरून भर दिवसा चोरीला गेली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

चेतन भिमाजी कदम (वय 28, रा. आळंदी मरकळ रोड, च-होली खुर्द) यांची सात हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली. याबाबत कदम यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शेखर लक्ष्मणराव मडले (वय 32, रा. एकतानगर, चाकण) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मडले यांची 27 हजारांची दुचाकी (एम एच 14 / एफ टी 7116) अज्ञात चोरट्यांनी देहू-आळंदी रोडवरील श्री हॉटेलसमोरून चोरून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

कुदळवाडी रोड ते केएसबी चौक रोडवर पार्क केलेल्या एका टेम्पोमधून अज्ञात चोरट्यांनी तीन हजार रुपये किमतीची बॅटरी चोरून नेली आहे. ही घटना रविवारी (दि. 29) सकाळी उघडकीस आली असून याबाबत बिपीन दत्तात्रय बहिरट (वय 30, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.