Chinchwad : चाकण, हिंजवडी, वाकड मधून एक लाखांच्या चार दुचाकी चोरीला

Four two-wheelers worth Rs 1 lakh were stolen from Chakan, Hinjawadi and Wakad.

0

एमपीसी न्यूज – चाकण, हिंजवडी, वाकड मधून अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि. 12) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

चाकण जवळ खराबवाडी येथील तायो निपॉन कंपनीच्या गेट जवळून 7 ऑक्टोबर रोजी 20 हजारांची स्प्लेंडर प्लस दुचाकी भर दिवसा चोरीला गेली. याबाबत अनिल दत्तात्रय बेंढाले (वय 36, रा. शिरोली, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हिंजवडी येथील मेझा 9 चौकातील पेट्रोल पंपावरून मोपेड दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत नेहा श्रीकांत वलसे (वय 22, रा. एक्झर्बिया सोसायटी, नेरे दत्तवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाकड पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यातील पहिल्या प्रकरणात विलास नागनाथ कौष्टी (वय 28, रा. आदर्शनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून त्यांची 30 हजारांची स्प्लेंडर दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 9 ऑक्टोबर रोजी रात्री दहा ते 10 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घडला आहे.

वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुस-या प्रकरणात प्रीतम प्रताप ननावरे (वय 32, रा. कावेरीनगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ननावरे यांची 15 हजारांची सी डी डिलक्स दुचाकी 9 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.