Akurdi : रस्त्यावर तेल सांडल्याने चार दुचाकी घसरल्या

आकुर्डी चौकात तासभर वाहतूक कोंडी

_MPC_DIR_MPU_II

एमपीसी न्यूज – आकुर्डी चौकात खंडोबाचा माळ गोदावरी हायस्कूलसमोर सर्व्हिस रोडवर तेल सांडल्याने चार दुचाकी घसरून पडल्या. या अपघातात दोन जणांना दुखापत झाली असून त्यांना जवळच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ही घटना आज रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली.

या घटनेमुळे आकुर्डी चौकात जवळपास तासभर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, आकुर्डी चौकातील वाहतूक पोलिसांनी अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संपूर्ण रस्ता धुऊन काढला. त्यानंतर जवळपास तासाभराने वाहतूक सुरळीत झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.