Chinchwad: उद्योगनगरीत वाहन चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना अटक; 5 कार, 9 दुचाकी जप्त

Four vehicle thieves arrested in pimpri-chinchwad; 5 cars, 9 bikes seized आरोपी अक्षय याने विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने पिंपरी, वाकड, देहुरोड व कोथरुड परिसरामध्ये मौजमजा करण्यासाठी दुचाकी वाहनांची चोरी केली आहे.

एमपीसी न्यूज – वाहन चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 कार आणि 9 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोन आणि पाचच्या पथकांनी केली आहे.

आकाश उर्फ पप्या राजेंद्र सांडभोर (वय 25, रा. अंकुश आनंद बिल्डींगच्या पाठीमागे संग्रामनगर झोपडपटी, ओटास्किम, निगडी पुणे), सुजित उर्फ सुज्या भिवा गायकवाड (वय 27, रा. घर नंबर पी 16 सेक्टर नंबर 22, संजयनगर ओटास्किम, निगडी, पुणे) अशी युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वाहन चोरीच्या गुन्हयांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी पोलिसांना सूचना दिल्या होत्या.  वाहन चोरीचे गुन्हे करणारे सराईत चोरटे एका चोरीच्या अ‍ॅक्सेस मोटार सायकलवरुन निगडी परिसरात संशयितरित्या फिरत आहेत, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी भक्ती शक्ती चौक परिसरात सापळा लावला. अ‍ॅक्सेस टू व्हिलर (एमएच 14 डीझेड 0526) वरुन दोन इसम भक्ती शक्ती चौकाकडून पवळे ब्रिजकडे भरधाव वेगाने जात होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वाहनचोरी केल्याचे कबूल केले.

चोरट्यांनी अ‍ॅक्सेस टू व्हिलर जून महिन्यात प्रेमअंकुर सोसायटी यमुनानगर येथून चोरल्याची माहिती दिली. तसेच वाहन चोरीतील मुख्य सुत्रधार बंडया उर्फ पुरुषोत्तम वीर (रा. नांदेड सिटी सिंहगडरोड पुणे) याच्यासोबत यमुनानगर निगडी येथून मारुती झेन, सनसिटी पुणे येथुन असेंट हुंदाई, दत्तवाडी पुणे येथुन मारुती 800, सिंहगडरोड वडगाव फाटा रोड येथून मारुती झेन व ताथवडे उदयानाजवळुन इस्टिम कार अशी चारचाकी वाहने चोरल्याची व एक दुचाकी अरबाज हुसेन तलफदार (रा. ओटास्किम निगडी) याने मागील चार महिन्यांपूर्वी ट्रान्सपोर्टनगर निगडी येथून चोरली असल्याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपींकडून 5 चारचाकी व 2 दुचाकी वाहने जप्त करुन एकूण 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

अक्षय दशरथ शिंदे (वय 20, रा. पत्राशेड, आजंठानगर, निगडी पुणे) आणि एका अल्पवयीन मुलाला युनिट पाचच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे व दत्तात्रय बनसुडे यांना माहिती मिळाली की, दोन इसम स्प्लेंडर गाडी घेवून हॉटेल कृष्णा व्हेजजवळ, किवळे गावाकडे जाणा-या रोडवरून जाणार आहेत. त्यांच्याकडे असलेली गाडी चोरी केलेली आहे.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्यांनी देखील वाहन चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपी अक्षय याने विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने पिंपरी, वाकड, देहुरोड व कोथरुड परिसरामध्ये मौजमजा करण्यासाठी दुचाकी वाहनांची चोरी केली आहे. वाहने वापरून झाल्यानंतर हे चोरटे वाहने लपवून ठेवत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून 7 दुचाकी जप्त केल्या आहेत.

दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 5 कार आणि 9 दुचाकी अशी एकूण 14 वाहने जप्त केली आहेत. या कारवाईमुळे वाहन चोरीचे 14 गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी ही पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे.

पोलीस उप निरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस कर्मचारी शिवानंद स्वामी, केराप्पा माने, प्रमोद वेताळ, दीपक खरात, वसंत खोमणे, उषा दळे, विपुल जाधव, चेतन मुंढे, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, आतिष कुडके, नामदेव राऊत, शिवाजी मुंढे, अजित सानप, पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, संदीप ठाकरे, मयुर वाडकर, गणेश मालुसरे, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, श्यामसुंदर गुट्टे, स्वामीनाथ जाधव, फारुक मुल्ला, सावन राठोड, नितीन बहिरट, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, गोपाळ ब्रम्हांदे व राजेंद्र कदम यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.