_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri: तोडफोडीचे सत्र सुरुच, नेहरूनगरमध्ये चार वाहनांचे मोठे नुकसान

Four vehicles vandalized in Nehru Nagar in pimpri

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरू झाले आहे. रविवारी (दि.31) पहाटेच्या सुमारास नेहरूनगर, पिंपरी येथे अज्ञात व्यक्तीने चार वाहनांची तोडफोड केली आहे.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरूनगर परिसरातील चार वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. ही घटना रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

वाहनांच्या काचा फोडताना नागरिकांनी कोणालाही पाहिलेले नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी वाहनांच्या तोडफोडीची घटना घडली त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत.

शहरातील वाहनांच्या तोडफोडीचे सत्र अद्यापही कायम आहे. पोलिसांनी चौकशीसाठी गाडी थांबविल्याच्या कारणावरून एकाने पोलिसांच्याच वाहनांची तोडफोड केली होती. ही घटना बोपखेल येथे दि. 10 मे रोजी घडली.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर दि. 18 मे रोजी चिंचवडच्या बिजलीनगर भागात दहशत निर्माण करण्यासाठी एका टोळक्याने 13 वाहनांची तोडफोड केली होती.

दि. 21 मे रोजी पिंपळे सौदागर येथील पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर एका टोळक्याने कार चालकाला मारहाण करीत परिसरातील काही वाहनांची तोडफोड केली होती.

त्यानंतर घरकुल, चिखली येथे आक्या बॉण्ड टोळीतील सदस्याचा शुक्रवारी (दि. 29) रात्री खून झाला. या टोळीच्या सदस्यांनी शनिवारी (दि. 30) आरोपी राहत असलेल्या परिसरातील वाहनांची तोडफोड केली.

दहशतीसाठी अथवा अन्य कारणांमुळे वाहनांची तोडफोड केली जाते. मात्र, यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.