Pimpri : पिंपरी, निगडी, वाकड आणि तळेगाव एमआयडीसी परिसरातून चार वाहने चोरीला

Four vehicles were stolen from Pimpri, Nigdi, Wakad and Talegaon MIDC premises.

एमपीसी न्यूज – पिंपरी, निगडी, वाकड आणि तळेगाव एमआयडीसी परिसरातून दोन लाख 90 हजार रुपये किमतीची चार वाहने चोरट्यांनी चोरून नेली आहेत. यामध्ये तीन दुचाकी आणि एक कारचा समावेश आहे. याबाबत सोमवारी (दि. 20) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेली वाहन चोरीची घटना 18 जुलै रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास भाटनगर पिंपरी येथे उघडकीस आली. याबाबत   अब्बुतलाहा शोहराब अली शेख (वय 46, रा. भाटनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांनी त्यांची पंधरा हजार रुपये किमतीची एम एच 14 / ए वाय 8410 ही दुचाकी 17 जुलै रोजी रात्री राहत्या घरासमोर पार्क केली होती. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 18 जुलै रोजी पहाटे उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

वाहनचोरीचा दुसरा प्रकार निगडी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. याबाबत सुरेशकुमार केशरीचंद मरोठी (वय 61 रा. अप्पुघर मागे, निगडी) यांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेशकुमार यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची एम एच 14 / सी आर 7961 ही दुचाकी 13 एप्रिल रोजी निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगरच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 13 एप्रिल रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

वाहन चोरीची तिसरी घटना वाकड परिसरातील दत्तनगर, थेरगाव येथे सोमवारी (दि. 20) दुपारी बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत नारायण खंडू पवार (वय 49, रा. दत्तनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

फिर्यादी पवार यांनी त्यांची पंधरा हजार रुपये किमतीची एम एच 14 / ए 5511 ही दुचाकी रविवारी (दि. 19) रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

वाहन चोरीच्या चौथ्या घटनेची फिर्याद तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत सुधन्वा द्वारकानाथ पानसे (वय 46 रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नारायण ढाकणे (रा. अहमदनगर. पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पानसे आणि आरोपी ठाकरे यांच्यामध्ये हायड्रोलिक सिलेंडरच्या कारणावरून वाद सुरू आहे. या वादाच्या कारणावरून फिर्यादी यांच्या मावळ तालुक्यातील मंगळूर येथील कार्यालयासमोर पार्क केलेली अडीच लाख रुपये किंमतीची कार एम एच 12 / जी एफ 3725 आरोपी ढाकणे याने चोरून नेली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.