Chinchwad : पिंपरी, वाकड, चिखली, मोशीमधून 4 लाख 85 हजारांची चार वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी, वाकड परिसरातून दोन दुचाकी, चिखलीमधून एक टेम्पो तर मोशी मधून एक तीनचाकी रिक्षा चोरीला गेला आहे. तसेच देहूरोड येथे दुचाकीच्या डिक्कीतून 39 हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत शनिवारी (दि. 28) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गौरव समाधान खैरनार (वय 20, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 50 हजार रुपये किमतीची होंडा शाईन दुचाकी (एम एच 14 / जी क्यू 6030) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

वसीम सलीम मुल्ला (वय 31, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मुल्ला यांची 15 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस दुचाकी (एम एच 14 / सी वाय 3010) अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि. 28) पहाटे पहाटे पावणे दोन ते सकाळी दहा वाजताच्या कालावधीत चोरुन नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

बसवराज श्रीमंत गावडे (वय 40, रा. वडाचा मळा, जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गावडे यांचा तीन लाख रुपये किमतीचा एलपीटी 909 टेम्पो (एम एच 14 / बी जे 0547) अज्ञात चोरट्यांनी घराजवळून चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

सागर बाळू आल्हाट (वय 33, रा. आल्हाट वस्ती, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आल्हाट यांची एक लाख 20 हजार रुपये किमतीची तीनचाकी रिक्षा (एम एच 14 / एच एम 0134) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोर चोरुज नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

अनिता दत्तात्रय जाधव (वय 40, रा. तळेगाव दाभाडे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव यांच्या मोपेड दुचाकीची डिक्की उचकटून अज्ञात चोरट्यांनी डिक्कीमधून 39 हजार रुपये रोख रक्कम आणि कागपत्रे चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 27) दुपारी दोन ते अडीच वाजताच्या सुमारास देहूरोड परिसरात घडली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.