Pune Accident News :  पुण्यात भरधाव डंपरची चार चाकीला धडक, आजोबा आणि दीड वर्षे नातवाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-नगर महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने चारचाकी वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Pune Accident) दीड वर्षीय नातू आणि आजोबांचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला आहे. हा अपघात 12 जून रोजी लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ओम साई हॉटेल समोर घडला.

अद्वैत अमोल कुलकर्णी (वय दीड वर्षे) आणि महेश संभुस (वय 60) असे मृत्युमुखी पडलेल्याची नावे आहेत. तर या अपघातात नीलिमा महेश संभुस (वय 55) जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी दीपक कुलकर्णी यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस डंपर चालकाचा शोध घेत आहेत.

Chandrakant Patil Birthday : सनी निम्हण यांच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा रुपी शुभेच्छा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपा आणि त्यांचा मुलगा अद्वैत आणि आई नीलिमा आणि वडील हे चारचाकी वाहनातून पुणे-नगर रस्त्यावरून नगर कडे जात होते. मयत महेश संभुस हे कार चालवत होते. यावेळी भरधाव वेगात आलेल्या डंपरने त्यांच्या कारला जोराची धडक (Pune Accident) दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अद्वैत आणि महेश यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.